बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांना दिवाळीत मिळणार म्हाडाचं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे | म्हाडाकडून यंदा पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत 3 हजाराहून अधिक घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यातील दीड हजार घरं ही नामांकीत बिल्डर्सच्या प्रकल्पातील आहेत. म्हाडाने मागील एक ते दोन वर्षात 8 हजार घरांची सोडत काढली आहे.

म्हाडाने जाहीर केलेली ही या वर्षातील तिसरी लॉटरी आहे. म्हाडाने याआधी वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात सर्वात मोठी म्हणजेच 5 हजार 217 घरांची सोडत काढली होती. यामध्ये पुणे शहरातील 410, पिंपरी- चिंचवड परिसरातील 1020 तर कोल्हापूरमधील 62 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली होती.

त्यानंतर म्हाडाने 2 जुलैला 2 हजार 908 घरांची सोडत काढली होती. ऑनलाईन पद्धतीने ही सोडत काढण्यात आली होती. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर महापालिका हद्दीतील घरांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. म्हाडामुळे हजारो लोकांना चांगली घरं मिळाली आहेत.

आता पुन्हा म्हाडाने दिवाळीच्या मुहूर्तावर तिसरी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने याआधी अनेक लोकांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. कोरोनाकाळात सोडत काढून तर म्हाडाने नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. जानेवारी महिन्यात काढलेल्या या सोडतीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

थोडक्यात बातम्या- 

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

राज्यातील कॉलेज उद्यापासून सुरू, मात्र या नियमांचं करावं लागणार पालन, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More