मुंबईतली म्हाडाची घर तब्बल ‘इतक्या’ लाखांनी कमी होणार; फडणवीसांनी केली घोषणा

MHADA House l मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण सध्या म्हाडाच्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. म्हाडाच्या लॉटरीत घराच्या किमती अशाच राहिल्या तर सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार? अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती झाल्या कमी :

आता मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. 62 लाख रुपयांचे घर 50 लाख रुपयांना आणि 39 लाख रुपयांचे घर 29 लाख रुपयांना मिळणार आहे. तसेच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी खाजगी विकासकांनी बांधलेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर दिली आहे.

MHADA House l अर्ज करण्याची मुदत वाढवली :

मुंबईत घरांसाठी म्हाडाची लॉटरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांनी घरांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना आता ड्रॉची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता अर्जदारांना सोडतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

इच्छुकांना आता 19 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्ज आणि ठेव मुदतवाढीच्या आत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. म्हाडाच्या सोडतीची यापूर्वी 13 सप्टेंबर ही तारीख होती, मात्र अर्ज सादर करण्याची वेळ वाढल्याने तीही लांबणीवर पडली असून, लवकरच त्याची नवी तारीख जाहीर होणार आहे.

News Title – MHADA House Prices 2024

महत्त्वाच्या बातम्या-

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…

त्या माय-लेकींनी टवाळखोरांना असं काही धुतलं की पुन्हा आयुष्यात …

“..पेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं”; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचं विधान, नेमकं काय घडलं?

“राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, मला अ‍ॅलर्जी.. “; शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे ठाकरे गटाच्या नेत्याचा हात?, निलेश राणेंचा गंभीर आरोप