म्हाडा लॉटरीसाठी अशाप्रकारे करा अर्ज; घरांची किंमत किती असेल?

MHADA House

Mhada Lottery 2024 l म्हाडाची लॉटरी 2024, येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे, म्हाडामध्ये एकूण 2,030 युनिट्सपैकी मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीतील सर्वाधिक घरे असणार आहेत. त्यामध्ये जवळजवळ 768 अपार्टमेंट्स असणार आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मुंबईसाठी सप्टेंबरमध्ये लॉटरी काढण्याचे आमचे ध्येय आहे आणि काही दिवसांत अंतिम घोषणा देखील केली जाणार आहे.

अशाप्रकारे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करा :

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हाडा लॉटरी 2024 मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. कारण म्हाडाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे. तसेच नागरिकांना यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास म्हाडाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत.

यासोबतच म्हाडाने मोबाइल अॅपदेखील सुरू करण्यात आलं आहे. त्याद्वारे देखील तुम्ही रजिस्टर करु शकता. मात्र रजिस्टर पूर्ण झाल्यानंतरच अर्जदार म्हाडा लॉटरी 2024साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी Mhada Lottery 2024 लाइ्व्ह होणार आहे.

Mhada Lottery 2024 l घरांच्या किंमती किती असणार? :

म्हाडाच्या घरांच्या किमती असणार असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. मात्र EWS गटातील घरांच्या किंमती साधारण 30 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 3 BHK घरं उच्च गटातील असून या घरांची किंमत तब्बल 1 कोटींच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

म्हाडातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळासाठी लॉटरीची जाहिरात काढण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांची लॉटरी तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे. तसेच 8 ऑगस्टला म्हणजेच उद्याच 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

News Title : Mhada Lottery 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वजनामुळे विनेश फोगाट ठरली अपात्र, जाणून घ्या काय आहे नियम? :

विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप

टाटा कंपनी भन्नाट फीचर्ससह सादर करणार सेन्सर कार; किंमत असणार सर्वांच्या बजेटमध्ये

दिवंगत अभिनेता सुशांत सिंहबद्दल सारा अली खानचा खळबळजनक खुलासा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .