MHADA Nashik | नाशिक म्हाडा (MHADA) मंडळातर्फे 502 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 20 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन अनामत रक्कम 21 मार्च 2025 पर्यंत स्वीकारली जाणार आहे.
अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) अंतर्गत मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदूर दसक, देवळाली आणि मौजे दसक येथे विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक घटकासाठी एकूण 502 सदनिकांची लॉटरी निघणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत असेल, अशी माहिती नाशिक म्हाडाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली आहे.
सोडतीसाठी अर्ज कसा करावा?
नाशिक म्हाडाच्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2:30 पासून सुरू झाली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक अर्जदारांना 20 मार्च 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. ऑनलाईन अनामत रकमेचा स्वीकार 21 मार्च 2025 पर्यंत सुरू राहील. RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम वेळ 21 मार्च 2025 रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत असेल.
सोडतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती
स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 9 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीच्या तारखेची अधिकृत घोषणा नंतर केली जाईल. या लॉटरीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 300 सदनिकांचा समावेश आहे. अर्ज नोंदणीसाठी इच्छुकांनी MHADA अधिकृत संकेतस्थळ येथे भेट द्यावी.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत 202 सदनिकांची विक्री केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी व अनामत रकमेचा भरणा करावा. सोडतीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे आणि अर्ज करण्यापूर्वी MHADA च्या अधिकृत माहिती पुस्तिकेचे वाचन करावे.
Title : MHADA Nashik Lottery Deadline Extended Till March 20