पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

Mhada Pune Lottery | पुणेकरांचं स्वतःचं घर साकार करण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील घरांसाठी सोडत (Mhada Pune Lottery) जाहीर केली आहे.

यामध्ये तब्बल 4777 घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे745 आणि 561 घरांचा यामध्ये समावेश आहे. या सोडतीसाठी आजपासून (8 मार्च) अर्ज भरता येणार आहेत.

म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते. त्यामुळे पुणेकरांसाठी ही सोनेरी संधी असणार आहे.

अर्ज करण्याची मुदत काय?

म्हाडाच्या घरासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 10 एप्रिल रोजी रात्री 11.59 पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत (Mhada Pune Lottery)  12 एप्रिलपर्यंत ठेवली आहे.

अर्ज कसा करणार?

अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागेल. यासोबतच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी.

सोडतीचा तपशील

म्हाडा योजनेंतर्गत (Mhada Pune Lottery) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य : 2461 सदनिका
म्हाडाच्या विविध योजना : 18 सदनिका
म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना : 59 सदनिका
पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी): 978 सदनिका
20 टक्के योजना पुणे महापालिका745 आणि पिंपरी-चिंचवड 561 एकूण 4777 सदनिका

News Title :  Mhada Pune Lottery 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्वात मोठं गिफ्ट!

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान