‘या सरकारचं पाणी येगळंच हाय’, ‘पाणी फाऊंडेशन’च्या कामाचं श्रेय लाटलं!

सातारा | ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती आणि वाद हे समिकरण काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. आता साताऱ्यातील बिदाल गावची ‘मी लाभार्थी’ची जाहिरात वादात सापडलीय. 

‘या सरकारचं पाणी येगळंच हाय’ असं साताऱ्यातील बिदाल गावातला शेतकरी सांगतो, अशी ही जाहिरात आहे. मात्र पाणी फाऊंडेशननं केलेल्या कामाला जलयुक्त शिवारचं काम दाखवल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय. 

2017-18 साठी बिदाल गाव जलयुक्त शिवारमध्ये आलं. मात्र या गावासाठी अजून तरतूद नाही, तसेच निधीही आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय सरकार लाटत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय.