जनतेशी संवाद साधण्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा चुराडा

मुंबई | जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्य सरकारकडून 4 कोटी 45 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आलाय. मी मुख्यंत्री बोलतोय, दिलखुलास आणि जय महाराष्ट्र सारख्या कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

अर्थ विभागाकडून या कार्यक्रमांसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना जनतेशी संवाद करण्याच्या नावाखाली एवढी उधळपट्टी करणं योग्य आहे का? असा सवाल विचारला जातोय. 

मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जनतेशी संवाद साधतात. जय महाराष्ट्र तसेच दिलखुलास या कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्री आपल्या कामांचा पाढा वाचत असतात तसेच योजनांची माहिती सांगत असतात, मात्र जनतेशी खरंच संवाद होतो का? हा संशोधनाचा विषय आहे.