बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता

मुंबई | सध्या सगळीकडे ओटीटी माध्यमांची चलती असताना ‘प्लॅनेट मराठी’च्या रुपाने महाराष्ट्राला स्वतःचा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म मिळाला. या प्लॅटफॉर्मकडून मराठी प्रेक्षकांना चांगल्या कलाकृतींची अपेक्षा असताना अत्यंत सुमार दर्जाचे चित्रपट आणि वेब सीरिज त्यांच्या माथी मारणं चालू असल्याचं दिसत आहे. प्लॅनेट मराठीची नवी वेब सीरिजही अशा प्रकारची असल्याचं दिसत आहे.

राज्याच्या राजकारणात ‘न भूतो न भविष्यती’ अशी घडामोड पहायला मिळाली, अजूनही या घडामोडींची मालिका थांबायला तयार नाही. याच घडामोडींवर आधारित वेब सीरिज प्लॅनेट मराठीवर प्रसारित होणार आहे. ‘मी पुन्हा येईन’, असं या वेब सीरिजचं नाव आहे. २९ जुलैला ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

एकीकडे साऊथच्या सिनेमांची बॉलिवूडमध्ये चलती असलेली पहायला मिळत आहे. उत्पन्नाचे नवनवे रेकॉर्ड्स हे सिनेमे करत असताना पहायला मिळत आहेत. हिंदीतील अनेक वेब सीरिजनी देखील चांगली लोकप्रियता मिळवली आहे, मात्र मराठीत अशा प्रकारच्या कलाकृती तयार होताना दिसत नाहीत. सध्या येणार असलेली ‘मी पुन्हा येईन’ ही वेब सीरिज अत्यंत सुमार दर्जाची असल्याचं ट्रेलरमधून तरी दिसत आहे.

अत्यंत तगडी स्टारकास्ट, मोठं फंडिंग असलेलं प्लॅनेट मराठीसारखं बॅनर असताना देखील ही वेब सीरिज जमून आली नाही, असं ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर घाईघाईत प्रेक्षकांपुढे देण्याच्या नादात वेब सीरिजची वाट लागल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर या वेब सीरिजच्या ट्रेलरखाली अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, या प्रतिक्रियांची संख्या पाहता प्लॅनेट मराठीच्या ‘रानबाजार’ प्रमाणेच या वेब सीरिजचा देखील बाजार उठण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात बातम्या-

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

माहेरी गेलेल्या बोयकोला परत आणा म्हणत तरुण चक्क टॉवरवर चढला!

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे जे त्यांच्या नादी लागले ते…”

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More