बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

नवी दिल्ली | बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुबंई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात विराट कोहली आणि मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यात चांगलीच खुन्नस पहायला मिळाली.

विराट आणि सूर्यकुमार यादवमध्ये झालेली ही टशन सोशल मिडीयावर मात्र चांगलीच रंगली. दरम्यान सूर्यकुमारचं 4 वर्षांपूर्वीचं ट्विट आता व्हायरल झालं आहे. यामध्ये सूर्यकुमारने विराटला देवाची उपमा दिली होती.

सूर्यकुमार यादवने मार्च 2016 मध्ये हे ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने विराटचा फोटा पोस्ट केला होता. “सामन्यादरम्यान जेव्हा जबाबदारी असते आणि दबाव असतो, त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर मी देवाला फलंदाजी करताना पाहिलं” असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बुधवारच्या सामन्यात विराट सुर्यकुमारकडे खुन्नस नजरेने पाहिलं. यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हटवली नाही. आयपीएलमधील या क्षणांची सोशल मिडीयावर मात्र भरपूर चर्चा रंगली.

महत्वाच्या बातम्या-

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या तीन युवा नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

“मुंगेरमध्ये हिंदूंचे रक्त सांडले, त्याविरोधात घंटा कधी बडवणार”

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More