Top News खेळ

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

दुबई | आयपीएलच्या स्पर्धेत सध्या सुपर किंग्ज सध्या सात पराभवांसह गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्जला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. दरम्यान आजचा सामना मुंबई इंडियन्सशी आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नईच्या समर्थकांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. प्रत्येक सामन्याआधी दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये जोरदार जुंपते. मात्र यंदाच्या वर्षी चेन्नईले प्ले ऑफ गाठणं फार कठीण झाल्यामुळे या संघर्षाने टोक गाठलंय. तर आजच्या चेन्नईच्या फलंदाजांची परिस्थिती पाहता त्यांच्या समर्थकांची काही खैर नाहीये.

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र मैदानावर फलंदाजीसाठी उतरताच चेन्नईची खराब कामगिरीला सुरुवात झाली. अवघ्या 3 रन्समध्ये चेन्नईने 4 विकेट्स गमावल्या होत्या.

सध्या चेन्नईचा अर्ध्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये इतक्या विकेट्स पहिल्यांदात गमावल्या आहेत. चेन्नईचा संघ 100 रन्स पार करेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.


महत्वाच्या बातम्या-

“पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल”

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार म्हणाले…

‘मला दिल्लीतल्या वरिष्ठांनीच सांगितलं की…’; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या