Top News खेळ

IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई

मुंबई | आयपीएलच्या स्पर्धेत सध्या सुपर किंग्ज सध्या सात पराभवांसह गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा मुंबई इंडियन्स विरूद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘करो या मरो’ ठरणार आहे.

प्ले ऑफसाठी चेन्नईला उरलेल सर्व सामने जिंकणं भाग आहे. याशिवाय स्पर्धेतील इतर संघांच्या कामगिरीवरही चेन्नईचं भवितव्य निश्चित आहे. तर दुसरीकडे उत्तम फॉर्ममध्ये असलेला मुंबई संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित झालंय.

स्पर्धेच्या सलामीच्याच सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मात्र चेन्नईने त्यानंतर सतत त्यांचा पराभव झाला. चेन्नईकडून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींमध्ये संघ खराब कामगिरी करतोय.

मुंबईचा भक्कम पाया म्हणजे त्यांचे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. या सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या 10 गोलंदाजांच्या यादीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न; आव्हाड गृहनिर्माण मंत्रिपद सोडण्यास अनुत्सुक

पुण्यातील बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या