MI vs GT | गुजरातच्या मैदानावर काल (24 मार्च) गुजरात आणि मुंबई यांच्यात सामना रंगला. नेहमीप्रमाणे यंदाही पहिली मॅच मुंबईने देवालाच वाहिली. गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर 8 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. 6 बॉलमध्ये 19 धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली.
पहिल्या बॉलवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या बॉलवर चौकार लगावला. मात्र, पुढच्या दोन बॉलवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने विजय नोंदवला. यंदाच्या हंगामातही मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला. 2013 पासून मुंबई आतापर्यंत कधीही पहिला सामना जिंकलेला नाही.
मुंबई इंडियन्स संघात पहिल्यांदाच रोहित शर्मा नेतृत्वाशिवाय खेळला. तर, या मैदानात हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची नाराजी होती. ती कालच्या सामन्यात मैदानात दिसून आली. त्यामुळे हा सामना खूपच चर्चेत ठरला. त्यातच हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि बुमराह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
रोहित आणि बुमराह हार्दिकला भिडले?
एका व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हार्दिकसोबत भिडताना दिसून येत आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ प्रथमच फिल्डिंगसाठी उतरला. मुंबईच्या संघातील सिनियर खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं अगोदर पासूनच बोललं गेलं. हीच गोष्ट काल मैदानात दिसून आली.
Rohit in 2024 is being treated like Advani in 2014 https://t.co/Ys82JW3svu
— Sagar (@sagarcasm) March 24, 2024
सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि बुमराह हार्दिकवर एका गोष्टीवरून (MI vs GT) नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. झालं असं की, ओवर्सच्या दरम्यान बुमराह हार्दिकशी काहीतरी चर्चा करत होता. या चर्चेत रोहितही सहभागी होतो आणि रोहित येताच पांड्या काहीतरी बोलून परत जाऊ लागला.
रोहित आणि हार्दिकचा व्हिडिओ व्हायरल
पुढे रोहितच्या हावभावांवरून असं दिसतं (MI vs GT) की तो बुमराहकडे याची तक्रार करत आहे.तिथून निघताना रोहित हार्दिककडे बोट दाखवतो आणि काहीतरी बोलतो आणि हार्दिकनेही ते मान्य केल्याचं दिसतं. ही चर्चा स्टंप माईकपासून दूर झाली. त्यामुळे गोष्टी ऐकू येत नव्हत्या. मात्र, व्हिज्युअल पाहता हे स्पष्ट होतं की, एमआयचे हे तीन खेळाडू काहीतरी मुद्यावरून भांडत होते. हा वाद नंतर स्पष्ट जाणवला, जेव्हा हार्दिक पांड्याने रोहित शर्माला मैदानात फील्डसाठी इकडे-तिकडे फिरायला लावले. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो आता व्हायरल होत आहेत.
News Title : MI vs GT Jasprit Bumrah and Rohit Sharma argue with Hardik Pandya
महत्त्वाच्या बातम्या-
कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार
मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’
लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!
संभाजीराजेंची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाले ‘राजघराण्याची झूल न पांघरता’
बच्चू कडूंची अमरावतीत मोठी खेळी; मुख्यमंत्र्यांनी फोन करत थेट भेटायलाच बोलवलं