बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एवढी कुठं ताकद असते का राव?, ‘या’ खेळाडूनं शॉट मारताच बॅटचे दोन तुकडे, पाहा व्हिडीओ

चेन्नई | आयपीएल २०२१चा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात रोहित शर्मांची मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात काही जबरदस्त गोष्टी घडत आहेत, यापैकीच एक गोष्ट म्हणजे खेळाडूंच्या अंगात ताकद किती असते याचा प्रत्यय प्रेक्षकांना आला.

त्याचं झालं असं की इशान किशन बाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या फलंदाजीसाठी आला होता. बंगळुरुचा जेमिसन यावेळी गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर क्रुणाल पांड्याने चौकार मारला, मात्र हा नोबॉल ठरला, त्यामुळे जेमिसनला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. आता हा चेंडू फ्री हीट देखील होता त्यामुळे क्रुणाल पांड्या त्याला जोरदारपणे टोलवण्यासाठी तयार होता.

जेमिसनने जसा तिसरा चेंडू पुन्हा टाकला तसा हा चेंडू सीमेपार पाठवण्यासाठी क्रुणाल पांड्याने आपली सर्व ताकद पणाला लावली. मात्र क्रुणाला चकवा देण्यात जेमिसन यशस्वी झाला, असं झालं असलं तरी क्रुणालनं लावलेली ताकद एवढी जास्त होती, की त्याच्या बॅटचे थेट दोन तुकडेच झाले. बॅटच्या दांड्यापासून खालचा भाग वेगळा झाला होता.

क्रुणाल पांड्याच्या बॅटचे तुकडे होताच सारे अवाक् झालेले पहायला मिळाले. त्यानंतर क्रुणालला नवी बॅट देण्यात आली, मात्र क्रुणाल पांड्याला काही खास खेळी करता आली नाही. तो ७ चेंडूत ७ धावा काढून बाद झाला.

पाहा तीन व्हिडीओ-

 

 

 

थोडक्यात बातम्या-

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सची भन्नाट आयडिया, वाचा सविस्तर

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

लस घेतल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना?; सीरमच्या अदर पुनावालांनी सांगितलं खरं कारण

पुण्यात वीकेंड लाॅकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More