बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ चेंडूनं केला विराट कोहलीचा घात, उजवा डोळाच केला लाल!

चेन्नई | आयपीएलच्या १४ व्या सिझनच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दुखापतीला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सच्या क्रुणाल पांड्याने मारलेल्या जोरदार फटक्यावर कॅच घेण्याचा प्रयत्न करताना विराटला ही दुखापत झाली.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरु असताना १९ व्या षटकामध्ये ही घटना घडली. पहिल्याच चेंडूवर हा अपघात झाल्यानं आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसला होता, मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यानंतरही विराट क्षेत्ररक्षण करताना दिसल्याने आरसीबीच्या जीवात जीव आला.

आरसीबीच्या काईल जेमीसनने १९ वं षटक टाकलं. पहिल्याच चेंडूवर क्रुणाल पांड्याने मीड ऑफच्या वरुन जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कोहलीनं हा फटका कॅच घेण्याचा प्रयत्न केला यावेळी हा बॉल हातातून सुटून थेट त्याच्या उजव्या डोळ्याजवळ लागला. विराट कोहलीच्या चेहऱ्यावर याचं निशाण देखील पहायला मिळालं.

मुंबई इंडियन्सचा डाव संपल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना कोहली डोळ्याला बर्फाचा शेक देताना दिसून आला. मात्र, यानंतर तो आरसीबीकडून सलामीला फलंदाजी करण्यास उतरला. त्याने डावाची सुरुवात चांगली तर केलीच, मात्र चांगला खेळही केलेला पहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या-

बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूनं मोडली मुंबईची कंबर, निम्मी टीम पाठवली माघारी!

…म्हणून मुंबई इंडियन्सचे समर्थक म्हणतात, पहिली मॅच आम्हाला हरायचीय!

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं अन् रडणं बाईसारखं- गोपिचंद पडळकर

एवढी कुठं ताकद असते का राव?, ‘या’ खेळाडूनं शॉट मारताच बॅटचे दोन तुकडे, पाहा व्हिडीओ

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More