Top News तंत्रज्ञान देश

मायक्रोसॉफ्ट या देशी ऍपमध्ये करू शकते १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक…!

नवी दिल्ली | सध्या मायक्रोसॉफ्ट नाव खूपच चर्चेत आहे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉक ऍप खरेदी करण्याच्या विचारात होती. भारतात टिकटॉक अ‌ॅपवर बंदी घातल्यावर अमेरिकाही त्याच विचारात होती. पण आता मायक्रोसॉफ्ट भारताच्या प्रादेशिक भाषेतील सोशल मीडिया ऍप शेअरचॅट (Sharechat) ऍपमध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करू शकते.

सर्वांची नजर टिकटॉक ऍपवर असताना आता शेअरचॅटही त्यात सामील झाल आहे. आता मायक्रोसॉफ्ट नेमकं कशात गुंतवणूक करते, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. शेअरचॅट त्यांच्या विस्तारासाठी गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. भारत देशात शेअरचॅटचे १४० दशलक्षपेक्षा जास्त सक्रिय वापरकर्ते आहे.

मायक्रोसॉफ्टच्या आधी ट्विटरनेही शेअरचॅटमध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या दरम्यान कंपनीची बाजार मूल्य किंमत ६५० दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल ४८०० कोटी रुपये आहे. शेअरचॅट ऍप हे हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलगु, तमिळ, बंगाली, उडिया, राजस्थानी, कन्नड, असमिया, हरियाणवी, भोजपुरी आणि उर्दू अशा तब्बल १५ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

शेअरचॅटने मागील महिन्यात सांगितले होते की, त्यांचा शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Moj ऍप गुगल प्ले स्टोरवरून एका आठवड्यात तब्बल ५० लाख लोकांनी डाउनलोड केले होते. जेव्हा टिकटॉकवर बंदी घातली होती, तेव्हा त्यांनी हे ऍप बाजारात उतरवले होते. प्रादेशिक भाषेच्या या ऍपसाठी महत्त्व कमी करण्यासाठी Google Cloud ने आपल्या पायाभूत सुविधेत आमुलाग्र बदल केला होता. या ऍपच्या सक्रिय वापरकर्त्यांचा एक मोठा हिस्सा tier-2 आणि tier-3 या शहरात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक रूग्ण….

अखेर प्रतीक्षा संपली..! पुढच्या आठवड्यात रशियामध्ये जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी होणार…

‘त्या’ फ्लॅट्सच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.