देश

मायक्रोसाॅफ्टचे सीईओ नडेला यांना शिकवणीची गरज; भाजप खासदाराचा टोला

नवी दिल्ली | मायक्रोसाॅफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर केलेले वक्तव्य भाजप नेत्यांना चांगलंच झोंबल्याचं दिसतंय. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी यावरुन नडेला यांना टोला लगावला आहे.

नडेला यांचे वक्तव्य हे साक्षरांना सुशिक्षित करण्याची कशी गरज आहे याचे योग्य उदाहरण आहे, असा टोला मीनाक्षी लेखी यांनी लगावला आहे. याच कारणासाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान देशातील शरणार्थींना आम्ही संधी देणार आहोत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

अमेरिकेमध्ये यजीदी मुस्लिमांऐवजी सिरियन मुस्लिमांना संधी देण्यात याव्यात याबाबत नडेला यांचे काय मत आहे? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. लेखी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

दरम्यान, सीएए अंतर्गत तीन देशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. यावर बोलताना नडेला यांनी भारतामध्ये सध्या जे काही चालले आहे ते दु:खद असल्याचं म्हटलं होतं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजपच्या माजी आमदाराचं वक्तव्य

मी नाराज नाही, काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत- एकनाथ शिंदे

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या