दुबई | प्रशिक्षक रिकी पॉन्टिगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करतेय. मात्र अजूनही या संघात अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने सीजनच्या मध्यांतरात तो दुसऱ्या संघात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सीजनच्या मध्यांतरात मीड सिजन ट्रान्सफरला सुरुवात होईल. ज्यामध्ये टीम त्यांना हव्या त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकते. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ओपनींग फलंदाजीसाठी रहाणेचा विचार करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची कामगिरी चांगली होत होतेय. त्यामुळे अजिंक्य रहाणेला त्याची संधी येईपर्यंत वाट पहावी लागेल.
महत्वाच्या बातम्या-
‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी
आयपीएल वर सट्टा लावणारी टोळी गजाआड; 11 जणांना रायगडमध्ये केली अटक
…तर सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे- कंगणा राणावत
‘मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या’; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश