Middle Child Syndrome l प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत त्यांच्या भावंडांचा (Siblings) मोठा वाटा असतो. भावंडं एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकत असतात. मात्र, असे असतानाही मधले मूल (Middle Child) हे नेहमीच दुर्लक्षित (Neglected) राहते. परंतु, एका संशोधनातून (Research) असे दिसून आले आहे की, ही मुले काही वेगळी आणि महत्त्वाची असतात. अभ्यासानुसार, जन्मक्रम (Birth Order) व्यक्तिमत्त्व (Personality) घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि काही विशिष्ट गुणधर्म बहुतेकदा भावंडांच्या स्थानाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, मोठ्या भावंडांना (Elder Siblings) सामान्यतः अधिक जबाबदार आणि सक्रिय मानले जाते, जे ‘एल्डर डॉटर सिंड्रोम’ (Elder Daughter Syndrome) या संकल्पनेतून ओळखले जाते.
दरम्यान, लहान भावंडांना (Younger Siblings) अनेकदा शांत आणि आरामशीर मानले जाते, ज्यामुळे त्यांना ‘द स्पॉइल्ड ब्रॅट’ (The Spoiled Brat) असे म्हटले जाते. पण या सगळ्यात मधले भावंड दुर्लक्षित राहते. इतर भावंडांशी जोडल्या जाणाऱ्या स्टिरियोटाइप्सप्रमाणे (Stereotypes), मधले मूल ‘मिडल चाइल्ड सिंड्रोम’ने (Middle Child Syndrome) ओळखले जाते.
वेबएमडीने (WebMD) वर्णन केल्याप्रमाणे, याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. जसे की, पालकांकडून (Parents) कमी लक्ष मिळणे, भावंडांनी केलेल्या चुका झाकणे. मधल्या मुलाची ही संकल्पना अनेक चित्रपट (Films) आणि शोजमध्ये (Shows) देखील दाखवली गेली आहे. जेना ओर्टेगाचा (Jenna Ortega) डिस्ने शो (Disney Show) ‘स्टक इन द मिडल’ (Stuck in the Middle) एका मधल्या मुलाच्या तिच्या अनेक भावंडांसह असलेल्या संघर्षांचे चित्रण करतो. तसेच बहुतांश घरांमध्ये तसाच अनुभव असल्याचे समोर आले आहे.
पण एका अभ्यासात मधली मुले अतिशय वेगळी असल्याचे म्हटले गेले आहे. त्यांच्यामध्ये असलेले विशेष गुण त्यांचे वेगळेपण अधोरेखित करतात.
Middle Child Syndrome l मधल्या मुलाचे ‘हे’ गुण त्यांना बनवतात खास :
मधल्या मुलामध्ये काही खास गुण असतात. ही मुले इतर मुलांच्या तुलनेत वेगळी असतात. अभ्यासात हेक्साको पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीचा (HEXACO Personality Inventory) वापर करण्यात आला, जो सहा गुण मोजणारे एक साधन आहे. प्रामाणिकपणा-नम्रता (Honesty-Humility), भावनिकता (Emotionality), बहिर्मुखता (Extraversion), सहमतता (Agreeableness), कर्तव्यदक्षता (Conscientiousness) आणि अनुभवासाठी मोकळेपणा (Openness to Experience) असे गुण या मुलांमध्ये असतात.
अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, मधल्या मुलांनी प्रामाणिकपणा-नम्रता आणि सहमतता या स्वभावामध्ये सर्वोच्च गुण मिळवले. सहमतता हे असे वैशिष्ट्य आहे जिथे एखादी व्यक्ती दयाळू (Kind) आणि इतरांशी जुळवून घेणारी (Adjusting) असते.
मधली मुले प्रामाणिक आणि नम्र असतात. त्यांचा इतरांबाबत असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. त्यांच्यात इतरांना क्षमा (Forgive) करण्याची प्रवृत्ती देखील जास्त असते.
मोठ्या आणि लहान भावंडांच्या भांडणात अडकलेली ही मुले तडजोड (Compromise) आणि सहकार्य (Cooperation) यांसारखे गुण देखील दाखवतात.
संशोधकांनी असेही उघड केले की, मधली मुले त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी इतरांचा वापर करण्याची शक्यता कमी असते.