मोठी बातमी! हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळून मोठा स्फोट; पाहा Video

Mig 29 Aircraft Crashed | राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातातून पायलट सुखरूप बचावला असून विमान खाली कोसळताच मोठा स्फोट झाला. यानंतर त्याला आग लागली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (Mig 29 Aircraft Crashed )

हवाई दलाचे मिग 29 विमान (Mig 29 Aircraft) क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बारमेरमध्ये मध्यरात्री हे विमान कोसळलं. तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान खाली कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन आग लागली. लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

हवाई दलाचं मिग 29 लढाऊ विमान कोसळलं

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील पायलट सुखरूप असून त्यांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अपघातस्थळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. या प्रकरणी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. (Mig 29 Aircraft Crashed )

या अपघाताबाबत हवाई दलाने एक निवेदन जारी केले आहे. हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटनुसार, “बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग-29 मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला विमानातून बाहेर पडावं लागलं. पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.”

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात कोसळलं विमान

दरम्यान, बाडमेर उतरलाई एअरबेसजवळ हा भीषण अपघात झाला. यापूर्वीही अनेकदा मिग-29 विमान कोसळल्याचे अपघात झाले आहेत. या वर्षी मार्चमध्ये एक तेजस विमान जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग कोसळले होते. तर,4 जून रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव गावाजवळ दुपारी 1:20 वाजता हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले होते. (Mig 29 Aircraft Crashed )

News Title : Mig 29 Aircraft Crashed

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा!

प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या

… म्हणून अंगाला काय भोकं पडत नाहीत; अजितदादा सुप्रियाताईंना असं का म्हणाले?

खुशखबर! iPhone झाला स्वस्त; मिळतेय 19 हजारांची सूट

वनराज आंदेकरांच्या वडिलांचा अत्यंत धक्कादायक खुलासा!