कोल्हापूर | लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर यूपी, बिहार या राज्यात पोहचत आहेत. कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. अशातच कोल्हापूरहून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाच्या हातात असलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं.
छत्रपतींचे विचार युवकांना सांगण्यासाठी मूळचा बनारसचा असणाऱ्या तरुणाने शिवराज्याभिषेकाचा फोटो हातात घेऊन ट्रेनमधून रवाना झाला.
हम भी शिवाजी महाराज इनपर बहुत प्यार करते है, अशी भावना या तरुणाने व्यक्त करत छत्रपतींचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. सुशील यादव असं या तरुणाचं नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा हा तरुण गेल्या 13 वर्षापासून कागलमध्ये राहतो.
दरम्यान, कागलज येथील मयूर एस टी कॅन्टीनमध्ये तो काम करतो. या परिसरात त्याचे अनेक मित्र आहेत. कोल्हापूर हे छत्रपतींच्या गादीचा वारसा असणारं ठिकाण आहे. त्यामुळे अनेक तरुणांप्रमाणे सुशील यादवलाही छत्रपती शिवरायांबद्दल आदर आणि प्रेम आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क
मी टीकेचा धनी होईन, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायची माझी तयारी आहे- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर
रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत
“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”
Comments are closed.