…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली | बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. 16 वर्षीय ब्राझीलियन मॉडेलची छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

मिका सिंग एका कार्यक्रमासाठी दुबईत गेला आहे. याठिकाणी एका तरुणीने त्याच्याविरोधात छेड काढल्याची तक्रार पोलिसात केली.

पोलिसांनी मिका सिंगला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याची रवानगी अबुधाबी येथील कारागृहात करण्यात आलीय.

मिकाने या मुलीला मोबाईलद्वारे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचं कळतंय. दरम्यान, 2006 सालीसुद्धा मिकाने भरपार्टीत आयटम गर्ल राखी सावंतचं जबरदस्ती चुंबन घेतलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

-भाजपला जोरदार झटका; हिरे पिता-पुत्राची घरवापसी

-भाजपमुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे- अशोक चव्हाण

-अमित शहांना कोलकाता हायकोर्टाचा दणका!