Loading...

सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

मुंबई | वादामुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक मिका सिंगने सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरं बांधून देणार असल्याची घोषणा  केली आहे. मिकाने पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स केला म्हणून त्याच्यावर बंदी घातली आहे. या प्रकरणामुळे वादात असलेल्या मिकाने जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांना मदत केली आहे.

माझं पूरग्रस्त बांधवांना आश्वासन आहे की माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात 50 घरं बांधून देईन, असं मिकाने म्हटलं आहे.

Loading...

महाराष्ट्रात पूरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. यापूरात अनेकांचा जीव गेला, मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालं आहे. सरकार काम करत आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीशी संबंधित एनजीओही पूरग्रस्तांसाठी चांगलं काम करत आहेत, असं मिका सिंगने म्हटलं आहे.

दरम्यान, मिकाने पूरग्रस्त भागात मदत करत देशभरातील लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण

-पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षांचा ऋणानुबंध

-“विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा हात पिरगळलाच नाही”

Loading...

-ते शिवसेनेतून आले, राष्ट्रवादीकडून हरले आणि पुन्हा शिवसेनेत निघून गेले!

-ही गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?; आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संजय बर्वे संतापले

Loading...