बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron रूग्णांमध्ये सापडतात ‘ही’ एकसारखी लक्षणं; तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

नवी दिल्ली | द. आफ्रिकेत Omicron हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर जवळपास 57 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे. भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने सर्वच स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे.

देशात सर्वात प्रथम कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली व गुजरातमध्येही ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत. भारतात आढळलेल्या जवळपास ओमिक्रॉनबाधित रूग्णांत सौम्य लक्षणे आढळून आल्याचं निदर्शनास आलं आहे.

देशात आढळून आलेल्या ओमिक्रॉनबाधितांमध्ये कोणतेही गंभीर लक्षणं नाहीत. सौम्य लक्षणं असणं हे अधिक धोक्याचं असतं. यामुळे आपण गाफिल राहातो आणि संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे omicronच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच सतर्क राहाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. (Mild Symptoms In Omicron Patients In India)

दरम्यान. कोरोनामुक्त झालेल्या राजस्थानमधील 9 ओमिक्रॉनबाधितांमध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. लक्षणं सौम्य असतील किंवा जाणवत नसतील तर लोक चाचणीसाठी पुढे येत नाहीत किंवा विलगीकरणातही राहात नाहीत. परिणामी कोरोना झाल्याचं समोर येत नाही. त्यामुळे सौम्य लक्षणं अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More