मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार आहेत ते व्हिडीओ निवडणूक आयोगाने तपासून पाहावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
राज ठाकरेंच्या पोलखोल व्हिडीओंना भाजप 27 एप्रिलला उत्तर देणार आहे, असं बोललं जातंय. 27 एप्रिलला प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप दाखवेल त्या व्हिडीओंना कोणताही पक्ष उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवेल तो आधी तपासून घेण्यात यावा, अशी मागणी मिलींद देवरा यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ चे उत्तर आता भाजप मनसेच्या स्टाईलनं देणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागला आहे याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-मुस्लिम वृद्धाची शाल स्विकारण्यासाठी मोदींनी रॅली थांबवली अन् शाल पांघरली…!
-राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!
-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!
-युतीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या गावाला पोलिसांचा धाक; आव्हाडांचा गंभीर आरोप
–…म्हणून आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी दिला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा!
Comments are closed.