मिलिंद एकबोटेंची अटक अटळ, अखेर अटक वॉरंट जारी!

पुणे | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. पुणे सत्र न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केलंय. मात्र मिलिंद एकबोटे सध्या फरार आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. 

1 जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ही मागणी फेटाळून लावल्यानंतर एकबोटेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथंही त्यांना दिलासा मिळाला नाही. आता त्यांची अटक अटळ आहे.