मुंबई | धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन एकबोटे यांनी त्यांची भेट घेतली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम 24 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो, असं मिलिंद एकबोटे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मिलिंद एकबोटे यांचं नाव कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रचंड चर्चेत आले होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
फटाक्यामुळे मुळशीत लग्नसमारंभादरम्यान लागली भीषण आग
येस बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा; ट्विट करून दिली ‘ही’ माहिती
महत्वाच्या बातम्या-
“घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र लांबूनच नमस्कार करा”
वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
…म्हणून अमृता फडणवीस ट्रोल होतात- अदिती तटकरे
Comments are closed.