बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा

नागपूर |  लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली आहे. प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी राजीनामा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठीच या निवडणुकीत काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आंबेडकरी समाजाला वेगळे वळण मिळावे यासाठी 12 वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारले. मात्र भारिप सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत आहे, असं ते म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही. उलट ते भाजपला 7 ते 8 जागा जिंकूण देण्यास मदतच करतील, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”

-श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी

-“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

-नथूराम गोडसे दहशतवादीच होता- प्रकाश आंबेडकर

-भाजपचे 80 कार्यकर्ते मारले गेले, बंगालमधील हिंसेला ममता जबाबदार- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More