नागपूर | दूध भुकटीला अनुदान देऊन सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
तत्पूर्वी दूध भुकटी निर्यातीला 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. खासगी उत्पादकांनी दूध भुकटी तयार करुन ठेवली आहे ती कशी निर्यात होईल याची काळजी सरकार घेत आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपये दरवाढ द्या आणि ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी विरोधकांची आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी केलेल्या घोषणांवर विरोधक समाधानी नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या–
-अधिवेशनात दूध दरवाढीवर विरोधक आक्रमक; पहा लाईव्ह चर्चा…
-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…
-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात
-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप
-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती