बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

नवी दिल्ली । मागील तीन महिने शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. विविध ठिकाणी महापंचायत भरवून देशातील शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी करण्याचा प्रयत्न शेतकरी संघटना करत आहेत. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांचा पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे खिसा साफ होत आहे. तर एलपीजी गॅसच्या किंमती देखील 100 रूपयांनी वाढल्या आहेत. त्यात आणखी भर म्हणून संयुक्त किसान मोर्चाने दुधाच्या किंमतीत दुपटीने वाढ करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे, तरी देशातील नागरिक शांतच आहेत. पेट्रोलची किंमत वाढवली तशीच जर डिझेलची किंमत आणखी वाढवली तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकू, असा ठाम निर्णय संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. पेट्रोल शंभरीपार गेले तरी 135 कोेटी जनता आणखी थंडच आहेत. जनतेला जर 100 रूपयांच्या पेट्रोलचे ओझे होत नाही तर आम्ही देखील दूध 100 रूपयांनी विकणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं आहे.

सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी, शेतकऱ्यांनाच सर्वात जास्त त्रास होतो. इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वापरणे फार कठीण झाले आहे. आंदोलन आणि वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी संतापले आहेत, असं भारतीय किसान युनियनचे जिल्हा अध्यक्ष मलकीत सिंग यांनी सांगितले आहे.

शेतकरी कायद्याच्या विरोधात प्रत्येक राज्यात एक मोठी रॅली काढण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. आज 26 फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनाला 3 महिने पुर्ण झाल्याने युवा किसान दिवस साजरा करण्यात आला. तर उद्या 27 फेब्रुवारीला गुरू रविदास जयंती आणि चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त मजुर-किसान एकता दिवस साजरा केला जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

1 मार्चपासून शाळा बंद की चालू??? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी

तो आला, जामीन मिळवला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा फरार झाला!

नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांना ओढायचा आपल्या जाळ्यात!

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More