Top News कोल्हापूर

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

कोल्हापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी नऊपासून कोल्हापूरमधूम मुंबई आणि पुण्याला दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

राज्य सरकारने मराठा मराठा आरक्षण प्रश्नी पुढील निर्णय होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे. यामध्ये 50 हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या आवाहनाला विरोधी पक्षांसह, विविध पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा- सदाभाऊ खोत

सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांचं अमित शहांना पत्र, म्हणाले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या