बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर…”

मुंबई |  कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. एवढंच नाही तर अनेक शेतकरी आक्रमक होऊन आंदोलनावर देखील आले आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शेतकऱ्यांची दिवाळी ठाकरे सरकारमुळे अंधारात असल्याचं म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील 55 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्षात 100 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटूंबांच्या घरात दिवाळीत अंधार पसरला असल्याचं प्रशांत परिचारक यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास परिचारक यांनी ठाकरे सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

आश्वासन आणि घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी नाहीतर जनतेची आणि शेतकऱ्यांची स्पेशल माफी मागावी, अशी मागणी परिचारक यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली असून त्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे बळी घेणारं सरकार ठरलं असल्याचं परिचारक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवणाऱ्या ठाकरे सरकारच्या ‘मातोश्री’, ‘वर्षा’, आणि ‘मंत्रालय’ मात्र रोषणाईमध्ये उजळणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जर थोडी जरी लाज असेल तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री आणि वर्षावर रोषणाई न करण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, अशी मागणी देखील प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

“प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, माझ्यावर कारवाई केली जाऊ नये”

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अशी होती पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिक्रीया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More