नवी दिल्ली | आपल्या धारदार वाणीने कायम मोदी सरकारच्या कामावर टीकेचा आसूड ओढणारे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी कोरोनाच्या भीषण काळात मोदी सरकार करत असलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. ट्विट करून त्यांनी मुस्लिम समाजाला देखील एक आवाहन देखील केलं आहे.
कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा उपचार पद्धतीचा कोरोनाग्रस्त रूग्णांवर चांगला परिणाम दिसून येत आहे. याच पद्धतीचा वापर करण्याचं सरकारने ठरवलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं ओवैसींनी कौतुक करत सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. मुस्लिम समाजतल्या बांधवांना यासाठी पुढे यावं, असं आवाहन केलं आहे.
असदुद्दीन ओवैसींनी ट्विट करून म्हटलं आहे की, “हा चांगला निर्णय आहे. करोनातून बऱ्या झालेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी समोर येऊन रक्तदान करावं. विशेषतः करोनामुक्त झालेल्या मुस्लीम नागरिकांनी रेड क्रॉसच्या स्वयंसेवकांशी संपर्क करावा आणि रक्तदान करावं. असंख्य भारतीयाचं तुम्ही प्राण वाचवणार आहात, हे त्यांनी लक्षात ठेवावं”.
दरम्यान, करोनाग्रस्त रुग्ण बरा करण्यासाठी कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी महत्त्वाची ठरु शकते. त्यामुळे सरकारनं रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांना विनंती केली आहे की, त्यांनी करोनामुक्त झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावं, असं केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर ओवैसींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
This is a good decision ,I request people who are cured to please help & come forward my special request to Indian Muslims who have been cured (Alhamdulliah) of Covid to please volunteer /contact Red Cross & donate blood ,remember you will saving many lives of INDIANS https://t.co/A0Wdk5KxTl
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 21, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“यांना साधू गेल्याचं दु:ख नाही तर त्यानंतर पेटवापेटवी अपयशी ठरली याचं वाईट वाटतंय”
…मग तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा महाराष्ट्र नव्हता का?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल
महत्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांनी एकजूटीने सरकारसोबत उभे रहावे- आकाश झांबरे पाटील
‘बिल्डरांनी वाट लावली, लाज वाटायला हवी’; झोपडपट्ट्यांमधील वाढत्या कोरोनामुळे रतन टाटा आक्रमक
Comments are closed.