विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

औरंगाबाद | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम राज्यात 100 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. एमआयएमने आपल्या 100 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडे सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याची भाषा सुरु आहे. तर दुसरीकडे वंचित स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत करत आहे.

मस्लिम आणि दलित मतांच मताधिक्य विजयापर्यंत पोहचवू शकतं. अशा जागा एमआयएम लढवणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील 100 जागांची एक यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम आघाडी करुन लढले होते. आताही विधानसभा निवडणुकी एकत्र लढण्यासाठी एमआयएम इच्छुक आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास

-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

-मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

Loading...