देश

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

नवी दिल्ली | एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली गळाभेट कामी आली नाही, असं वाटत आहे. म्हणूनच धार्मिक स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील संस्था युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमनं भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासोबत यादीत ठेवलं आहे, असं औवेसी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केल्यानंतरही युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमच्या अहवालानं भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया या देशांसोबत उभं केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी भारतावर बंधन घालण्याची शिफारसही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट कामी आली नाही हे यावरून सिद्ध झालं असल्याचं औवेसी यांनी सांगितलं.

दरम्यान, औवेसींनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या भारत सरकारच्या काही संस्था आणि त्यांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात यावी, तसंच त्यांची संपत्ती सीज करण्यात यावी आणि त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात यावी असं म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारने आतातरी भानावर यावं- विखे पाटील

संजय राऊत तुम्ही उत्तर प्रदेशची काळजी नका करू, महाराष्ट्र सांभाळा!- योगी आदित्यनाथ

पैशांचा तुटवडा असल्याने राहुल गांधींनी घेतली 1,000 रुग्णांची जबाबदारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या