बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबाद | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराचा प्रस्ताव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्ताव संमत केला. यानंतर या नामांतराला औरंगाबाद जिल्ह्यात विरोध केला गेला. विशेष म्हणजे काँग्रेस (Congress) पक्षाच्या आमदारांनी या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला पाठींबा दिल्याने आता पक्षश्रेष्ठींनी त्याचा अहवाल देखील मागविला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)  हे पूर्वीपासूनच या नामांतराच्या विरोधात होते. आता त्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध केला आहे. भरपावसात भडकलगेट पासून निघालेला मोर्चा आमखास मैदानावर येऊन थांबला. यावेळी जलील यांनी भाषणातून महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे. तर तो चांगला वाईट कसाही असला तरी इतिहास आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलू देणार नाही, असे जलील म्हणाले.

तीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनी ह्या शहराचे नाव बदला म्हणून सांगितले. त्यामुळे काही या शहराचे नाव बदलता येणार नाही. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या पक्षांनी याच मुद्द्यावरुन आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या प्रेमापोटी नाही तर खुर्ची हालायला लागली म्हणून घेतला. भाजप शिवसेनेची सत्ता असताना हा नामांतराचा निर्णय का घेतला नाही? असे प्रश्न जलील यांनी विचारले.

त्यामुळे कसाही असला तरी, तो इतिहास आहे. आम्ही औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही, असा पवित्रा जलील यांनी घेतला. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय अवैध ठरवून आता आम्ही निर्णय घेऊ, असे म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या – 

नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप

अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?

मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More