बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्ही १५ कोटी मात्र १०० कोटींना भारी; MIMच्या नेत्यानं गरळ ओकली

गुलबर्गा | सीएएच्या मुद्द्यावरुन देशात वातावरण तापलेलं असताना आता एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत मात्र १०० कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकमधील गुलबर्गा येथे वारिस पठाण यांच्या जाहीर भाषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

CAA संदर्भातील मोर्चांचा संदर्भ देताना ते म्हणाले, की “आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं, पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्या आहेत तरी यांचा घाम निघलाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल?”

आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना! ‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशा शब्दात वारिस पठाण यांनी गरळ ओकली आहे.

पाहा व्हिडिओ-

 

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ”

-शरद पवारांशी बाँडिंग असलेल्या भाजप नेत्यांची घरवापसी होणार- छगन भुजबळ

 

महत्त्वाच्या बातम्या-

-फाशी पुढे ढकलण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषीनं भिंतीवर डोकं आपटलं!

…नाही तर कायमचे बेरोजगार राहाल; योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल!

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावं चर्चेत!

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More