बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली | भारतात जेव्हा जेव्हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. तेव्हा देशाच्या राजकारणात मुस्लीम व्होट बॅंकविषयी चर्चा केल्या जातात. त्यामुळे भारतीय राजकारण हे मुस्लीम आणि हिंदू मतदार यांच्या भोवती फिरताना दिसतो आहे. अशातच आता एका जाहीर सभेत बोलताना एमआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

2014 ची लोकसभा निवडणुकीत एमआयएम लढली नाही, तरी भाजप पक्ष कसा जिंकला. 2017मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये एमआयएम 25-27 आणि भाजपला 300 जागा मिळाल्या. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ 15 जागांवर यश मिळवलं. मग त्या सगळ्या जागांवर भाजप कशी काय जिंकली, असा प्रश्नही ओवेसी यावेळी केला.

आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बॅंक आहे. मी संसदेत उभा राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मुस्लीम व्होट बॅंक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बॅंक होती, आहे आणि राहील, असं खळबळजनक वक्तव्य ओवेसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या देशात अशीही कोणतीही मुस्लीम व्होट बॅंक नव्हती, असं असतं तर भारताच्या संसदेत केवळ 23-24 खासदारचं का निवडून आले असते? असंही सवाल ओवीसी यांनी केला.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘मला ईडीचा समन्स आला तेव्हा…’; व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

“ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला…”

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More