Minahil Malik | सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात अनेक सिलिब्रेटी, रिल स्टार यांचे डिप फेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मीका मंदाना, आलिया भट्ट या अभिनेत्रींचे देखील काही डिप फेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा एकदा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील प्रसिद्ध स्टार मिनाहिलचा (Minahil Malik) MMS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिनाहिल मलिक पाकिस्तानी असून सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग पहायला मिळते. दरम्यान, मिनाहिलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाहीतर याबद्दल वाद वाढत आहे. यावेळी सोशल मीडिया स्टारने यावर प्रतिक्रिया दिली असून व्हिडीओबाबत खुलासाही केला आहे.
काय म्हणाली मिनाहिल?
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा फेक असल्याचं मिनाहिलने (Minahil Malik) म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये मिनाहिल तिच्या मित्रासोबत असल्याचा दावा करण्यात आला. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा करत मिनाहिल हिने व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ फेक आहे. याबाबत मी तक्रार देखील दाखल केली आहे आणि असं कृत्य करणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल. ज्याच्या मनात महिलांबद्दल आदर नाही अशी व्यक्ती असं कृत्य करु शकते ज्याच्या घरी आई – बहीण नाही, असं म्हणत मिनाहिल हिने चाहत्यांकडून मदतीची विनंती केली आहे.
News Title : Minahil malik video gets viral
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार
‘…तर तुम्हाला एवढं झोंबलं का?’; राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला
‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट