बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या

नवी दिल्ली | मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आली आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर ग्रामस्थांनी पीडितेला दोरीने बांधले आणि गावभर धिंड काढली. आश्चर्याची बाब म्हणजे पीडितेला आरोपीसोबत बांधून ठेवलेला नराधम हा जवळचा नातेवाईक होता. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे लक्ष देखील या प्रकरणाने वेधले असून मातोंडकर यांनी असंतोष व्यक्त केला आहे. उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण ‘अमानुष’ असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो, असा सवाल देखील केला आहे.

मध्य प्रदेशच्या या घटनेसंदर्भात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे चाहतेही यावर बऱ्याच कमेंट्स देत आहेत. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उर्मिला मातोंडकर यांनी लिहिले, ‘हे… माझी हैराणी माझ्या शब्दापलीकडे आहे’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशातील बलात्कार 16 वर्षीय पीडितेला आरोपीसह बांधले गेले आहे. ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली जात आहे. गावभर त्यांची धिंड काढली. आपण इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत. हा अमानुषपणा वेगळ्या स्तरावर आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. एका कुटुंबाने बलात्कार पीडित मुलीला आधार देण्याऐवजी बेदम मारहाण केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे.

थोडक्यात बातम्या –  

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

पुण्यासाठी आजचा दिवस जरा बरा, एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद

भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More