बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

नवी दिल्ली | इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असताना आता एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 7 वर्षात खनिज तेलांच्या किंमतीनी आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोच्च नोंद केली आहे. त्याचा आता थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलवर होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

खनिज तेलांच्या वाढलेल्या किमतीमुळे आता महागाईला त्रस्त झालेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. भारतात अत्यंत वेगाने इंधनाचे दर वाढत आहेत. आज पेट्रोल 25 पैसे तर डिझेल 32 पैशांनी वाढवण्यात आलं आहे. त्यानुसार मुंबईत सध्या पेट्रोल 108.67 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 98.80 रूपये प्रतिलिटर झालं आहे.

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये डिझेलने तर आता शंभरी पार केली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच आता 7 वर्षांतील सर्वात  जास्त दर खनिज तेलांचा झाल्याने भारतात आणखी इंधन दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रेंट क्रुडची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही प्रतिबॅरल 81 डाॅलर एवढी आहे. तसेच कोरोना महामारीमुळे खनिज तेलाचं उत्पादन हे अत्यंत कमी झालं आहे. तसेच आता अचानक हे उत्पादन वाढवणं शक्य नाही त्यामुळे ब्रेंट क्रुडचे दर हे येत्या काळात आणखी काही प्रमाणात वाढून त्याचा फटका इंधनाच्या किंमतींना बसू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद

…म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

आता विदर्भातील ‘या’ शहरात होणार नवं विमानतळ; पुढच्याच वर्षी होणार प्रवासी वाहतूक

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More