इंदौर | स्टेट बॅक आॅफ इंडियाने चालू वर्षातील तब्बल 41 लाख 16 हजार बचत खाती बंद केली आहेत. किमान मासिक रक्कम न ठेवल्यामुळे ही खाती बंद करण्यात आलीत, असं माहिती अधिकारात उघड झालंय.
बॅकेने गेल्यावर्षी किमान मासिक रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या खातेधारकांसाठी दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात हा दंड आकारण्यात आला.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात खाती बंद केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नोटाबंदीच्या काळात या खात्यांचा गैरवापर तर झाला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जातेय.
Comments are closed.