Ladki Bahin Yojana | राज्यातील महायुती सरकारने राज्यातील पात्र आणि लाभार्थी महिलांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर केली. या योजनेची घोषणापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘इतक्या’ महिलांचे अर्ज पात्र
योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. याबाबत मंत्री अदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत 1 कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरु असुन आतापर्यंत 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 अर्ज पात्र झाले आहेत, असं तटकरेंनी सांगितलं आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana | कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज?
महत्त्वाच्या बातम्या-
पावसाळ्यातील आजारांपासून एका झटक्यात मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करा
मळमळ, थंड घाम, थकवा अशी लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; अन्यथा..
“रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”
…यापुढे वीज बिल नाही; जाणून घ्या थकबाकी बिलाचं काय होणार?
आज नीरज चोप्रा खेळणार फायनल सामना; कुठे, किती वाजता पाहता येणार सामना?