Top News महाराष्ट्र मुंबई

‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट

मुंबई | भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हळहळून गेला आहे. यातच मंत्री अमित देशमुख यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

‘जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी आहे. हे घडायलाच नको होतं. हे का आणि कसे घडले याची कारणे शोधून शासनाकडून अभिप्रेत असलेल्या गोष्टी निश्चितच केल्या जातील’, असं ट्विट अमित देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे.

पण अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी रुग्णालयामध्ये आवश्यक असणाऱ्या बाबींचे वेळोवेळी ऑडिट करणे गरजेचं असल्याचही, असंही अमित देशमुखांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश!

पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; खुलासा करण्याचे आदेश

जाचक नियमांचा व्हॉट्सअपला फटका; जगभरात ‘या’ अॅची क्रेझ वाढली!

बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!

10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या