बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

नांदेड | काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूर यांचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे देगलूर बिलोरी मतदार संघातील विधानसभेची जागा रिक्त झाली. शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांनी आज काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साबणे यांच्या आरोपाला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय, असा आरोप साबणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे. सुभाष साबणे मुळातच शिवसेनेचे नेते आहेत. मी काॅंग्रेस पक्षामध्ये आहे. मग त्यांचा आणि माझा काय संबंध? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर यावं, मी जर शिवसेनेत सहन करत बसलो असतो तर आता काॅंग्रेसला मतदान मागितलं असतं. मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितलं असतं, असंही सुभाष साबणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यातील पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाचं असतो”

महाविकास आघाडीमुळं मोठा त्रास, शिवसेना सोडताना ‘हा’ नेता रडला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More