Top News महाराष्ट्र मुंबई

जिंदादिल बच्चू कडूंनी ओळखली सामाजिक जबाबदारी; एक महिन्याचा पगार देणार कोरोनाच्या लढाईसाठी

Loading...

मुंबई |  दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा कानी पडत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आता कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी एकत्र येत आहेत. मंत्री बच्चू कडू यांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. (Minister Bacchu Kadu Give 1 Month Payment CMO Fund)

मी माझं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. आपला देश आपलं राज्य कोरोना रोगासारख्या संकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणं गरजेचं आहे, असं म्हणत ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (Minister Bacchu Kadu Give 1 Month Payment CMO Fund)

Loading...

बच्चू कडू यांच्याप्रमाणे इतरही नेत्यांनी आपापली सामाजिक जबाबदारी ओळखून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याच बांधवांना मदत केली पाहिजे, अशी मागणी आता सोशल मीडियातून होऊ लागली आहे.

दरम्यान, समाजाच्या सर्व क्षेत्रातून कोरोनाग्रस्तांसाठी किंवा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक खेळाडू, उद्योगपती, राजकारण्यांनी आपापल्या परीने मदत केली आहे.  (Minister Bacchu Kadu Give 1 Month Payment CMO Fund)

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

भारताने योग्य वेळी योग्य पावलं उचलली आहेत; पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडून सरकारचं कौतुक

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या