बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री बच्चू कडूंनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे धक्कादायक माहिती समोर!

अकोला | मंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी वेशांतर करुन अकोला आणि पातूर शहरात शासकीय कार्यालये, स्वस्त धान्य दुकाने आणि काही दुकानांची तपासणी केली. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन तपासणी करत असताना एका दुकानदाराला प्रश्न विचारला की, हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का?.

हा माल दोन नंबरचा आहे. तसा विकू शकत नाही. तुम्ही हे काम करु शकणार नाही. त्यामुळे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यात अनेक लोकांना हप्ते द्यावे लागतात. हे काम सोपं नाही. आम्हाला पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात, असं दुकानदाराने सागितलं.

बच्चू कडू वेशांतर करून महानगरपालिकेतही गेले. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या वेशांतराचीच चर्चा सुरु आहे.

बच्चू कडू यांच्या या स्टिंग ऑपरेशननंतर पातूर इथल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विविध विभागात जाऊन त्यांनी तिथल्या कामकाजाची पाहणी केली. महापालिका आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या स्विय सहायकांशी त्यांनी संवाद साधला. मात्र त्यांना कोणीही ओळखलं नाही.

थोडक्यात  बातम्या- 

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

“शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील”

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More