बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा

मुंबई | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर दोन्हा नेत्यांबाबत ओबीसी आरक्षणावर दोन तास चर्चा झाली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.

छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ सागर निवासस्थानी भेटले. भुजबळांचं निवासस्थान रामटेक ते सागर बंगला यात थोडंच अंतर आहे. त्यामुळे आज सकाळीच छगन आणि समीर भुजबळ दोघेही देवेंद्र फडणवीसांना भेटले. या नेत्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चर्चा झाली.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा तारखेला दोन दिवसांचं झालं. त्यावेळीही याच विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी भुजबळांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावेळी विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी, इम्पेरिकल डाटा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भुजबळांनी काही दिवसापूर्वी मागणी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

पुण्यातच तयार होतेय ‘भारतातली पहिली mRNA’ कोरोना लस; वाचा संपुर्ण माहिती

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More