बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरावती हिंसाचार घटनेवरून महिला व बालविकास मंत्र्यांनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला

अमरावती | काही दिवसांपुर्वी त्रिपूराच्या पाणीसागर येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचं पाहायला मिळालं आहे. अमरावतीमध्ये काही समाजकंटकांनी निषेध नोंदवताना मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. परिणामी अमरावतीत जमावबंदीचे आदेश देण्यात आले तसेच संपुर्ण जिल्ह्य़ाला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आणि इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली होती.

या सर्व प्रकरणात राज्यातील विरोधी पक्ष भाजप हा मुद्दा पेटवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी अमरावतीच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार दंगल प्रकरणी एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत असताना अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत दोन्ही बाजूच्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे, अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे’, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाने थोडा संयम बाळगायला हवा, असा सल्ला ठाकूर यांनी फडणवीसांना उद्देशुन दिला आहे. महाराष्ट्रात शांताता राहावी यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे, असं म्हणत विरोधी पक्षाकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना ते वातावरण भडकवण्याचं काम करत आहेत, असा घणाघातही यशोमती ठाकूूर यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या

देश कोरोनामुक्तीच्या वाटेवर, पहिल्यांदाच कोरोनामुक्तीच्या दराने गाठला उच्चांक

‘शांततापुर्ण वातावरणातील आंदोलन सरकार दडपत असेल तर…’, दरेकरांचा गंभीर इशारा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, ‘या’ चेहऱ्यांना मिळाली मोठी संधी

“कंगणासारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते”

“…तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More