बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घरी जा अन्यथा, मेला तर आमची जबाबदारी नाही’; मंत्र्यानं रूग्णांना दिला धक्कादायक सल्ला

भोपाळ | मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा हॉस्पिटलमध्ये जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव यांच्यासमोर डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसंबंधित समस्या मांडल्या. यावेळी भार्गव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्ण घरी जाऊ इच्छित नाहीत. रुग्ण जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे, असं डॉक्टरांनी भार्गव यांनी सांगितलं. यावर मंत्री गोपाल भार्गव यांनी अजब वक्तव्य केलं आहे. रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेला तर आमची जबाबदारी नाही, असं गोपाल भार्गव म्हणालेत.

सर्व जिल्ह्यातील रुग्ण इथे आहेत. कोणालाही अडवू शकत नाही कारण हे सरकारी रुग्णालय आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले ते घरी जात नाहीत. ज्यांची ऑक्सिजन पातळी 96-98 आहे तेदेखील इथेच राहत आहेत. शुक्रवारी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यातील फक्त 1 रुग्ण घरी गेला. जर बरे झालेले रुग्ण हॉस्पिटलमध्येच राहत असतील तर गंभीर रुग्णांना कुठे ठेवायचं?, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

रुग्णांना सेवा देणं बंद करा, असंही मंत्री गोपाल भार्गव यांनी यावेळी म्हटलं आहे. गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांसोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

रेमडेसिवीर मिळत नसेल तर… खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘हे’ पर्यायी औषध!

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले कुंभमेळ्यातील सर्व संतांचे आभार!

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More