कोल्हापूर महाराष्ट्र

“माझा मित्र आधी हुशार होता, आता काय झालंय कळत नाही”

कोल्हापूर | सत्ता कुणाचीही असू द्या संकटकाळात सरकारबरोबर असणं गरजेचं असतं. मात्र फडणवीस हे राजकारण करत आहेत. फडणवीस माझे मित्र आहेत. ते आधी हुशार होते आताच काय असं झालंय कळत नाही, असं टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यात तारतम्य नाही. पाच वर्षात नाही हा शब्द ऐकायची त्यांची सवय मोडली म्हणूनच त्रास करुन घेत असावेत, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

गेल्या पाच वर्षात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांना काय सहनच होईना झालंय आता. हम करे सो कायदा असं त्यांचं होतं. त्यांनी गेल्या पाच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीची अनेक माणसं फोडून आपल्या पक्षात घेतली, स्वत:च्या पक्षात अनेकांना घरचा रस्ता दाखवला, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, स्वभाव असा बनलाय की, गेल्या पाच वर्षात त्यांना नाही म्हणणारं कोणी भेटलं नाही, त्यामुळे त्यांना आता सहन होईना झालंय. त्यांनी या परिस्थितीचं आकलन करुन आम्हाला सल्ला दिला पाहिजे. म्हणून मी माझ्या मित्राला तीन पुस्तक पाठवणार आहे. मौनम सर्वाथ साधनम्, मौन व्रतातून मनाची शांती आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय ही पुस्तकं पाठवणार आहेस, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…

पंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका!

राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या